Thursday 10 December 2015

मंगळवार मराठीचा..

१) खाली दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द ' चांदणे ' या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ?
अ) व्योम
ब) विताख
क) कौमुदी✔
ड) पयोधी

२) खाली दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द ' सौदामिनी ' या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ?
अ) शंभर स्त्रिया
ब) चपला✔
क) लता
ड) पल्लव

३) खाली दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द ' पक्षी' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही?
अ) चंडांशू✔
ब) खग
क) विहंग
ड) द्विज

४) खाली दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द ' सर्प ' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही?
अ) भुजंग
ब) अही
क) वायस✔
ड) व्याळ

५) खाली दिलेल्या पर्यायामधून ' शेष ' या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा पर्याय निवडा
अ) अवशेष
ब) अवशिष्ट
क) अशेष
ड) निःशेष✔

६) दिलेल्या पर्यायामधून ' तीन बाजुंनी पाणी असलेला प्रदेश ' या शब्द समूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा
अ) संगम
ब) खाडी
क) द्वीपकल्प✔
ड) बेट

७) दिलेल्या पर्यायामधून ' मागील कालखंडाचा आढावा घेणे' या शब्द समूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा
अ) पश्चिमाभिमुखन
ब) पुच्छावलोकन
क)समालोचन
ड) सिंहावलोकन✔

८) ' निढळ ' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा
अ) घाम
ब) डळमळीत
क) झरा
ड) कपाळ✔

९) ' हय ' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा
अ) बैल
ब) गाय
क) घोडा✔
ड) हत्ती

१०) ' पर ' या शब्दाचे अधिक अचूक अर्थ दिलेला गट खालील पर्यायामधून ओळखा
अ) परका , दुसऱ्याची वस्तू✔
ब) पारवा , दुसऱ्याची वस्तू
क) शहर , दुसऱ्याची वस्तू
ड) शहर , परका

No comments:

Post a Comment