Thursday 10 December 2015

गुरुवार गणिताशी गट्टी

१) आई आणि मुलाच्या आजच्या वयांचे गुणोत्तर १२:५ आहे मुलांच्या जन्माच्या वेळी आईचे वय २१ होते तर किती वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर २:१होईल?
अ) ४
ब) ६✅✅
क) ८
ड) १०

२) १० वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्या वेळेच्या वयाच्या १२पट होते आणि १० वर्षानंतर
 वडिलांचे वय मुलांच्या त्या वेळच्या वयाच्या दुप्पट  असेल तर त्यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे?
अ) १७ : ६✅✅
ब) १४ :५
क) १३ : ६
ड) यापैकी नाही

३) सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर ३ : ४ आहे .५ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ४ : ५ होईल तर ५ वर्षांपूर्वीचे त्यांच्या वयाचे  गुणोत्तर काढा
अ) १ : २
ब) २ : ३✅✅
क) ५ : ६
ड) २ : ५

४) अब्दुल चे आजचे वय १६ वर्षे ८ महिने आहे तर अल्बर्ट चे आजचे वय १२ वर्षे ६ महिने आहे तर त्यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर काढा.
अ) ४ : ३✅✅
ब) ९ : ८
क) २ : ३
ड) ३ : ५

५) वडिलांचे आजचे वय मुलांच्या आजच्या वयाच्या चौपट आहे . मुलाच्या जन्माच्या वेळेस वडिलांचे वय ३० वर्षे होते. तर चार वर्षापूर्वीचे त्यांच्या वयांचे गुणोत्तर काढा.
अ) ७ : ११
ब) १: ४
क) १: ६ ✅✅
ड) ३ : ७

६)माझ्या आईचे वय मी जन्मलो तेव्हा २१ वर्षे होते. आता आमच्या वयाची बेरीज ४९ वर्षे आहे तर आमच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती?
अ)  २ : ५✅✅
ब)  ३ : २
क)  ३ : ५
ड)  ३ : ७

७) एका कुटुंबातील चार व्यक्तींचे सरासरी वय ४० वर्षे आहे. त्यातील २४ वर्षे वयाच्या मुलाचे लग्न झाले त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीच्या वयांची सरासरी ३६  वर्षे झाली तर नवविवाहित जोडप्याच्या वयाचे गुणोत्तर काढा
अ) ३ : ५
ब) २ : ३
क) ४ : ५
ड) ५ : ६✅✅


८) ओजसचे आजचे वय ९ वर्षे आहे. आरव आणि ओजस यांच्या वयांचे गुणोत्तर २ : ३ आहे. सहा वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल?
अ) ३ : ४
ब) ४ : ५✅✅
क) ५ : ६
ड) यापैकी नाही

९) मनीष आणि त्याची तीन मुले यांच्या वयाची सरासरी १५ वर्षे आहे  सर्वात लहान मुलाचे वय ३ वर्षे आहे मुलांमध्ये तीन तीन वर्षांचे अंतर आहे तर मनिषच्या वयाचे त्याच्या मोठ्या मुलाच्या वयाशी असलेले गुणोत्तर काढा.
अ) ११ : ३
ब) १३ : ३
क) १४ : ३✅✅
ड) ५ : १


१०) एक मनुष्य व त्याची पत्नी यांच्या वयांची बेरीज त्यांच्या मुलांच्या वयांच्या बेरजेच्या चौपट आहे . चार वर्षांपूर्वी त्यांच्या वयांच्या बेरजेचे मुलांच्या वयांच्या बेरजेशी असलेले गुणोत्तर १८:१ होते. दोन वर्षानंतर ते गुणोत्तर ३:१ होईल तर त्यांना मुले किती?
अ) २
ब) ३
क) ४✅✅
ड) सांगता येणार नाही

No comments:

Post a Comment