Thursday 10 December 2015

मंगळवार मराठीचा - २

१) खाली दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द अशुद्ध आहे?

१) ऊर्मी
२) अतिथी
३) पृथ:क्करण✔
४) उदाहरण

२) खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

१) मतितार्थ
२) मतीतार्थ
३) मथितार्थ✔
४) मथीतार्थ

३) खाली दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द अशुद्ध आहे?

१) आशीर्वाद
२) उज्ज्वल
३) लवलेष✔
४) वाङ्मय

४) उपान्ह या शब्दाचा अर्थ काय?

१) उपवन
२) दुपार
३) पादुका✔
४) वामकुक्षी

५) खालीलपैकी ' अनृत ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

१) असत्य✔
२) कुंठित
३) अवगुंठित
४) झाकलेले

६)खालीलपैकी  ' नातू ' या शब्दाचे अनेकवचन ओळखा

१) नातवा
२) नातवे
३) नातू✔
४) नात्ये

७) अक्षर म्हणजे.....

१) परिवर्तनशील
२) क्षणभंगूर
३) अशाश्वत
४) नष्ट न होणारे✔

८) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

१) क्षीर = दूध
२) राऊळ = वारूळ✔
३) तनया = मुलगी
४) पादप = झाड

९) ' कंदुक ' या शब्दाचा अर्थ काय?

१) चेंडू✔
२) कासव
३) बदक
४) घास

१०) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) जळू = जळवा
२) कवी = कवी
३) बाजू = बाजवा✔
४) सासू = सासवा

No comments:

Post a Comment