Thursday 10 December 2015

कोल्ही आणि सिंहीण

एका कोल्हीने एका सिंहिणीजवळ आपल्या पिलांची खूप स्तुती केली. ती म्हणाली, 'आम्हाला दरवर्षी कितीतरी मुलं होतात, पण आम्हाला याचा अजिबात गर्व नाही. पण काही लोक मात्र एका वेळी फक्त १-२ पोरच जन्माला घालून इतरांना तुच्छ लेखतात. हा टोमणा जाणून सिंहिणीन उत्तर दिलं, की 'बाई तुम्हाला दर वेळेस खूप मुलं होत असतील पण तुमच्या मुलांना कोल्हा असं म्हणतात, आणि माझ्या एकाच मुलाला सिंह असे म्हणतात, हे विसरू नकोस.

तात्पर्य : ?

🐶🐺🐱🐭🐻🐷🐮🐗

       ||ज्ञानभाषा मराठी||
||माझी शाळा📚माझी भाषा||

No comments:

Post a Comment