Thursday 10 December 2015

📖रविवार – सामान्य ज्ञान📖

१) विश्व म्हणजे काय?
अ) सर्व दीर्घिका
ब) सर्व दीर्घिका + त्यामधील अवकाश
क) सर्व दीर्घिका+ त्यामधील  अवकाश + ऊर्जा + काळ✅✅
ड) अथांग अवकाश

२) सूर्य व पृथ्वी यातील अंतर किती आहे?
अ) ८.३० प्रकाशवर्षे
ब) ८.३० प्रकाश तास
क) ८.३० प्रकाश मिनिटे✅✅
ड) ८.३० प्रकाश सेकंद

३) विश्वाची निर्मिती कधी झाली असावी?
अ) १३०० कोटी वर्षांपूर्वी✅✅
ब) १३०कोटी वर्षांपूर्वी
क) १३ कोटी वर्षांपूर्वी
ड) ३१०० कोटी वर्षांपूर्वी

४) अवकाश म्हणजे काय?
अ) पृथ्वीची परिभ्रमण कक्षा
ब) तारकांचा समूह
क) आकाशगंगा
ड) खगोलांमधील पोकळी✅✅

५) पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना चंद्र जेंव्हा पृथ्वीच्या जास्तीतजास्त जवळ असतो त्या स्थितीस काय म्हणतात?
अ) उपभू✅✅
ब) अपभू
क) स्वयंभू
ड) दग्धभू

६) सूर्याच्या मदतीने करता येणारे कालगणनेचे एकक कोणते?
अ) अमावास्या
ब) वर्ष✅✅
क) शुक्लपक्ष
ड) कृष्णपक्ष

७) चांदणे म्हणजे काय?
अ) चंद्रापासून मिळणारी ऊर्जा
ब) ताऱ्यापासून मिळणारी ऊर्जा
क) रात्री आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांचा प्रकाश
ड) चंद्राकडून मिळणारा सूर्याचा परावर्तित प्रकाश✅✅

८) चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते?
अ) पृथ्वी चंद्राला झाकते✅✅
ब) पृथ्वी सूर्याला झाकते
क) चंद्र सूर्याला झाकतो
ड) सूर्य चंद्राला झाकतो

९) कंकणाकृती सूर्यग्रहण खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते?
अ) अमावास्या
ब) चंद्राची अपभू स्थिती✅✅
क) चंद्राची उपभू स्थिती
ड) वरील सर्व

१०) पृथ्वीला सर्वात जवळचा खगोल कोणता?
अ) बुध
ब)शुक्र
क) सूर्य
ड) चंद्र✅✅

११) पृथ्वी - चंद्र व पृथ्वी - सूर्य यांना सांधणाऱ्या रेषा पृथ्वीपाशी किती अंशाचा कोन करतात?
अ) ०
ब) ९०
क) १८०✅✅
ड) ३६०

१२) गटात न बसणारा ग्रह ओळखा.
अ) बुध
ब) शुक्र✅✅
क) शनी
ड) नेपच्यून

१३) खालीलपैकी कोणते विधान धुमकेतूंच्या बाबतीत सत्य आहे?
अ) धूमकेतू खगोल आहे.
ब) धूमकेतू सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो
क) धुमकेतूंचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूस असते.
ड) वरील सर्व✅✅

१४) खालीलपैकी कोणता ग्रह पाण्यात टाकला कि तरंगेल ?
अ) बुध
ब) गुरू
क) शुक्र
ड) शनी✅✅

१५) खालीलपैकी कोणते विधान ग्रहांच्या बाबतीत सत्य नाही?
अ) सर्व ग्रह स्वयं प्रकाशी नसतात
ब) सर्व ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे परिवलन करतात✅✅
क) सर्व ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात
ड) ग्रहांच्या उपग्रहांना चंद्र असे म्हणतात

१६) प्लूटो आणि यासारख्या इतर खगोलीय वस्तूना काय म्हणतात?
अ) बटू ग्रह ✅✅
ब) लघु ग्रह
क) उपग्रह
ड) यापैकी नाही

१७) ' ज्येष्ठा ' हा तारा कोणत्या तारकासमूहात आहे?
अ) मृग
ब) वृश्चिक✅✅
क) मघा
ड) आश्लेषा

१८) खालीलपैकी कोणत्या ग्रहाच्या कला असतात?
अ) पृथ्वी
ब) चंद्र
क) मंगळ
ड) शुक्र✅✅

१९) दक्षिण गोलार्धामध्ये एकूण किती तारकासमूह आहेत?
अ) ५५
ब) ३७
क) ५१✅✅
ड) ८८

२०) खालीलपैकी गुरू चा चंद्र कोणता आहे?
अ) टायटन
ब) पेगी
क) इन्सेलाडस
ड)गॅनिमिड✅✅

No comments:

Post a Comment