Thursday 3 December 2015

♻प्रश्नमंजुषा – ०५ - उत्तर♻

शंख-शिंपल्यांना छिद्र का असतात?

या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर आले नाही. सर्वांनी श्वासोच्छ्वास करण्यासाठी छिद्र असते हेच उत्तर दिले.

बरोबर उत्तर : शंख-शिंपल्यांमध्ये मॉलस्का हा जीव असतो, जो समुद्रात राहतो. या जीवाचं संरक्षण व्हावं यासाठी त्यावर कॅल्शियमचं कठीण कवच असत. तुम्ही किनाऱ्यावर छिद्र पडलेले असे शंख-शिंपले पाहता तेव्हा समजायचं की, त्यांच्यावर कोणत्या तरी समुद्री परजिवींनी हल्ला करून आतला जीव फस्त केलाय. हे परजीवी हल्ला करताना या शंख-शिंपल्याच्या आवरणावर बारीक छिद्र करतात.

      ||ज्ञानभाषा मराठी||

||माझी शाळा📚माझी भाषा||

No comments:

Post a Comment